दिनविशेष ३० डिसेंबर

दिनविशेष

दि. ३० डिसेंबर

◆ जन्म

१. (१८६५) नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक व कवी रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म

त्यांचे जंगलबुक हे पुस्तक फार गाजले

● निधन

१. (१९७१) भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार तथा अंतराळ संशोधनाचे पितामह डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन

ते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात

विक्रम साराभाई यांनी जागतिक कीर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरुवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली

२. (१९७५) प्रसिद्ध हिंदी कवी, कथाकार गजलकार दुष्यंत कुमार यांचे निधन

ते आधुनिक हिंदी साहित्यातील भारतीय कवी होते. ते हिंदी गझल लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि 20 व्या शतकातील प्रमुख हिंदी कवी म्हणून त्यांची ओळख आहे. दुष्यंत कुमार यांच्या ' से मी धूप' या गझलमधील ओळी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये वापरल्या जातात आणि हिंदी चित्रपट 'हल्ला बोल' मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो भी आग, लेकिन आगनी चाहिए


३. (२०१५) कवी, नाटककार पद्मविभूषण मंगेश पाडगावकर यांचे निधन

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं अश्या सुंदर कवितांच्या माध्यमातून जीवनावर प्रेम करण्याचा सकारात्मक संदेश त्यांनी दिला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर