दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष

दि. २८ ऑगस्ट

◆ जन्म 

१. (१९०६) रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म

ते मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते

२. (१९१८) प्रसिद्ध मराठी चित्रपट संगीतकार राम कदम यांचा जन्म

राम कदम 'लावण्या' प्रकारातील गाण्यासाठी नावाजलेले संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी चित्रपट माध्यमातूनही आपल्या संगीताचा ठसा उमठवला आहे. राम कदम यांनी १९४० ते १९९० या कालावधीत मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम कदम यांनी जवळजवळ २०० चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत, परंतु त्यांनी जास्तीत जास्त लावण्याच गायल्या आहेत. राम कदम यांनी १९७२ मध्ये पिंजरा चित्रपटांसाठी गायलेली 'मला लागली कुणाची उचकी' ही लावणी खूप गाजली होती


३. (१९२८) सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खॉं यांचा जन्म 

● निधन

१. (१९६९) भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन

रावसाहेब पटवर्धन हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी स्वातंत्र्यसैनिक होते. रावसाहेब पटवर्धन यांनी अहमदनगर येथील आपल्या भाषणांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी चेतना दिली. त्यांचे विचार ऐकून अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्यात उतरले. रावसाहेबांच्या भाषणांनी ब्रिटिशांविरुद्ध तरुण पेटून उठले

२. (२००१) चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन

ते मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता. त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत

३. (२०१०) संत साहित्याच्या अभ्यासिका, मराठी कवियत्री, लेखिका, सुहासिनी इर्लेकर यांचे निधन

या मराठी कवयित्री आणि लेखिका होत्या. संत साहित्याच्या अभ्यासक असलेल्या इर्लेकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला पीएच.डी होत्या

डॉ. सुहासिनी इर्लेकर या बीड येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागात विभागप्रमुख होत्या. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉलेजचे वाड्मय मंडळ विकसित केले होते. इर्लेकरांचे १० हून अधिक कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments