दिनविशेष २३ डिसेंबर

दिनविशेष

दि. २३ डिसेंबर

■ दिनविशेष

१. राष्ट्रीय शेतकरी दिन

देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिनी २३ डिसेंबर रोजी भारतात 'शेतकरी दिन' साजरा केला जातो


◆ जन्म

१. (१९०२) भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंग यांचा जन्म

चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने २००१ पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात

● निधन

१. (१९६५) नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन

गणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली किर्लोस्कर नाटक मंडळीच्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली गंधर्व नाटक मंडळी स्थापण्यात गोविंदराव टेंब्यांसह त्यांनी बालगंधर्वांना साह्य केले. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र इ.स. १९४० साली प्रकाशित झाले. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे

२. (१९९८) स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रत्‍नाप्पा कुंभार यांचे निधन

डाॅ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते

३. (२०१०) कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन

ते मराठी भाषेतील लेखक, समीक्षक होते. मौज, साधना वगैरे मासिकांतून त्यांचे बरेच नाट्यविषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे कामगिरी केली. कला व नाट्य क्षेत्रातील आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत

४. (२००४) भारताचे ९ वे पंतप्रधान नरसिंह राव यांचे निधन

ते भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली

५. (२०२५) ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन

त्यांच्या लेखनामध्ये नौकर की कमीज आणि दीवार में एक खिरकी राहती थी या कादंबऱ्यांचा समावेश आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर