दिनविशेष २० डिसेंबर

दिनविशेष 

दि. २० डिसेंबर 

■ दिनविशेष 

१. आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन (International Human Solidarity Day)

दरवर्षी २० डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन म्हणून साजरा केला जातो. विविधतेतील एकतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

मानवी समाजात एकतेचं महत्व वेळोवेळी दिसून येतं. संकटात सापडलेल्या जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील व्यक्तिच्या मदतीला लोकं धावून जातात. यामागे प्रेरणा असते एकतेची. यातूनच प्रेरणा घेऊन दरवर्षी २० डिसेंबर हा जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. विविधतेतील एकतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी २२ डिसेंबर २००५ रोजी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. लोकांना एकमेकांशी जोडून ठेवणाऱ्या समाजात एकता आणि संबंधांची मानसिक भावना निर्माण करणार्‍या उद्देशांची जाणीव म्हणून एकता दिवस साजरा केला जातो

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन हा शाश्वत विकास अजेंडावर आधारित आहे, जो लोकांना गरीबी, भूक आणि आजार यासारख्या गोष्टीतून बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रीत करतो. 'मिलेनियम डिक्लेरेशन'च्या अनुषंगाने, २१ व्या शतकातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे एक मूलभूत मूल्य म्हणून एकता ओळखली जाते

दिवस साजरा करण्याची विविध कारणे - 
१. विविधतेत एकता दाखवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
२. विविध सरकारांना आंतरराष्ट्रीय करारांची आठवण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
३. लोकांमध्ये एकतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
४. शाश्वत विकासासाठी लोकांना, सरकारांना प्रेरित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
५. गरीबी निर्मूलनासाठी नवीन मार्ग शोधणे हा दिवस साजरा केला जातो
६. लोकांना गरिबी, भूक, रोग यातून बाहेर काढण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

● निधन

१. (१९५६) महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, संत गाडगे महाराज यांचे निधन

ते महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे

गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत

२. (१९९३) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट यांचे निधन

३. (२००९) लेखक , संशोधक अरूण कृष्णाजी कांबळे यांचे निधन

ते दलित चळवळीचे लढाऊ नेते होते. नामांतर लढा व मंडल आयोग अंमलबजावणीचा पाठपुरावा करणारे, बौद्धांना केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे म्हणून झटणारे अग्रणी नेते आणि मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते दलित पॅंथर्स या संघटनेचे संस्थापक-सदस्य व अध्यक्ष होते. समाजातील विषमता नष्ट होऊन, समाज एकजिनसी व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. प्रभावी वक्तृत्व हा त्यांच्या कणखर नेतृत्वाचा एक भाग होता

४. (२०१०) लेखक प्रा. सुभाष भेंडे यांचे निधन

त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. इ.स. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते

प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. त्या लेखाचे पाठ्यपुस्तक मंडळाने काय हाल केले त्याची हकीकत गड्या आपुला गाव बरा येथे वाचता येईल

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर