दिनविशेष ०७ डिसेंबर

दिनविशेष

दि. ०७ डिसेंबर

■ दिनविशेष

१. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन (Indian Armed Forces Flag Day) हा दिवस शहीदांच्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ७ डिसेंबरला साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या देशातील सर्व सैनिकांना समर्पित आहे. देशबांधव या दिवशी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहतात

७ डिसेंबर या दिवशी देशातील जनता आणि इतर सामाजिक संस्था ध्वज वाटप करुन निधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या आणि मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज आणि विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणाऱ्यांना लाल, आकाशी आणि गडद निळ्या रंगांमध्ये असलेले छोटे ध्वज वाटले जातात. हे ध्वज हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड आणि केंद्रीय सैनिक बोर्ड या सशस्त्र दलांचे प्रतिक आहेत

● निधन

१. (१९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचे निधन

ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा. रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर