दिनविशेष ०५ डिसेंबर

दिनविशेष 

दि. ०५ डिसेंबर

■ दिनविशेष

१. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन (International Volunteer Day for Economic and Social Development) दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 1985 मध्ये हा दिवस सुरू केला, ज्याचे उद्दिष्ट समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात स्वयंसेवकांच्या योगदानाला मान्यता देणे आहे

स्वयंसेवक हे समाजातील गरजू घटकांसाठी निःस्वार्थपणे कार्य करतात. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, आपत्ती निवारण, आणि सामाजिक न्याय यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो आणि लोकांचे जीवनमान उंचावते

या दिवशी स्वयंसेवकांच्या कार्याला गौरवण्यात येते. शाळा, महाविद्यालये, आणि संस्थांमध्ये स्वयंसेवा उपक्रम राबवले जातात. लोकांना स्वयंसेवक होण्यासाठी प्रेरित केले जाते

आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन आपल्याला समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देतो. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने योगदान दिल्यास, एक सशक्त आणि न्यायपूर्ण समाज निर्माण होऊ शकतो


२. जागतिक मृदा दिन

दरवर्षी ५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. अलिकडच्या काळात शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी ८०० ते १००० वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने २०१३ साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला

◆ जन्म

१. (१९४३) ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म

ते एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे

२. (१९७४) मॅगसेसे पुरस्कार विजेते भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म

ते एक भारतीय पत्रकार, लेखक आणि मीडिया व्यक्तिमत्त्व आहेत. रवीश कुमार यांना २०१९ मध्ये आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. 'गरीब आणि सामान्य जनतेचा आवाज सार्वजनिक मंचावर उठवल्याबद्दल' पत्रकारिता क्षेत्रामधील त्यांच्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले

रवीश कुमार यांना दोनदा रामनाथ गोयंका पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट पत्रकार या श्रेणीत त्यांना सन्मानित करण्यात आले. २०१६ मध्ये द इंडियन एक्सप्रेसने आपल्या '१०० सर्वाधिक प्रभावशाली भारतीय लोकांमध्ये' रवीश कुमारांना समाविष्ट केले

● निधन

१. (१९५०) क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी योगी अरविंद घोष यांचे निधन

ते विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि योगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात

२. (२००७) मराठी लेखक, टीकाकार मा. वा. धोंड यांचे निधन

ते मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला

३. (२०१३) दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष, स्वातंत्र्यसेनानी, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन

४. (२०१६) तामिळनाडू च्या माजी मुख्यमंत्री जयललिता (अम्मा) यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर