दिनविशेष २५ नोव्हेंबर

दिनविशेष

दि. २५ नोव्हेंबर

■ दिनविशेष 

१. जागतिक महिलांवरील हिंसाचार निर्मुलन दिन (International Day for the Elimination of Violence against Women)

संयुक्त राष्ट्र संघ (United Nations) दरवर्षी २५ नोव्हेंबरला जागतिक महिलांवरील हिंसाचार निर्मुलन दिन साजरा करते. महिलांवरील हिंसाचार ही एक खूप मोठी सामाजिक समस्या आहे जी उदारमतवादी समाजांपासून कट्टरपंथी समाजापर्यंत एक मोठी समस्या म्हणून पाहिली जाते. या दिवशी महिलांसह पुरुषांनाही महिलांच्या हक्कांची जाणीव करून दिली जाते

जगातील अनेक देशांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अनेक अधिकार मिळाले आहेत. तरीही महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची (International Day for the Elimination of Violence against Women) प्रासंगिकता कायम आहे. ते पाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) दरवर्षी २५ नोव्हेंबरचा दिवस निश्चित केला आहे

◆ जन्म

१. (१८७२) ख्यातनाम नाटककार व पत्रकार नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म

ते ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते. पारतंत्र्याच्या काळात पत्रकार म्हणून ते आपले विचार 'केसरी'च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले होते. पण त्याच काळात खाडिलकरांनी 'स्वयंवर' 'मानापमान' सारखी ललित नाटके लिहिली. ते ‘नाट्यचार्य खाडिलकर’ म्हणून प्रसिद्ध आहेत

२. (१८८२) मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म 

ते महाराष्ट्रीयन चित्रकार होते. जलरंग आणि तैलरंगातील चित्रकारीतेत त्यांची विशेष ख्याती होती. ते उत्तम कलाशिक्षक आणि संगीताचे दर्दी म्हणूनही ख्यात होते

३. (१९२१) नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म 

ते मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली

भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते

● निधन

१. (१९८४) आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन

ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. 'युगांतर', 'सह्याद्रीचे वारे', 'कृष्णाकाठ', 'ऋणानुबंध' ही त्यांची साहित्यसंपदा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या. यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत


२. (२०१३) बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन

या मराठीतल्या बालकुमार साहित्यिक होत्या. मराठी आणि हिंदी भाषांच्या शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम राबवला केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या

ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत

३. (२०१६) क्युबाचे क्रांतीकारक नेते, माजी पंतप्रधान फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन

कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या फिडेल कॅस्ट्रो यांच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर