दिनविशेष ०६ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. ०६ नोव्हेंबर
◆ जन्म
१. (१९०१) लेखक, विचारवंत, समीक्षक प्रा. श्रीकृष्ण के. क्षीरसागर यांचा जन्म
ते मराठी लेखक, विचारवंत, समीक्षक होते. प्रा. श्री. के. क्षीरसागर हे टीकाकार म्हणून परिचित आहेत, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत
● निधन
१. (१९८७) मराठीतील लेखक व अभिनेते प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर यांचे निधन
ते मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. भालबा केळकरांनी बालनाट्ये आणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत
२. (१९९२) संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला आयुष्य समर्पित करणारे ख्यातनाम अभिनेते, गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांचे निधन
ते मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते होते. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला वाचवायसाठी त्यांनी पुढचे आयुष्य संगीत रंगभूमीसाठीच समर्पित केले. परिणामी त्यांनी रंगभूमीवर आणलेल्या संगीत नाटकांच्यामुळेच, संगीत रसिकांची पावले पुन्हा नाट्यगृहाकडे वळली. नव्या पिढीलाही त्यांनी संगीत नाटकांचे वेड लावले. ते वाढवले आणि युवा पिढीनेही संगीत नाटकाची ही परंपरा पुढे चालवायसाठी प्रयत्नही केले. जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी ’मराठी रंगभूमी' ही संस्था स्थापन करून, संगीत नाटकांची परंपरा पुनरूज्जीवित तर केलीच, पण पुन्हा संगीत रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे दर्शनही संगीत रसिकांना घडवले
स्वयंवर मधील कृष्ण, मानापमान मधील धैर्यधर, सौभद्र मधील अर्जुन या त्यांच्या भूमिका गाजल्या. शाहिर राम जोशी या चित्रपटात रंगेल शाहिराची भूमिका त्यांनी अजरामर केली. मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना करून त्यांनी अनेक संगीत नाटकांचे पुनररूजीवन केले
३. (१९९८) साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment