दिनविशेष ०५ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. ५ नोव्हेंबर
■ दिनविशेष
१. मराठी रंगभूमी दिन
२. जागतिक त्सुनामी जागरुकता दिन
दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. २२ डिसेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्ट्रांनी ५ नोव्हेंबर हा जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. त्सुनामी हा सर्वांत विनाशकारी व धोकादायक नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे. ज्याला समुद्रकिनाऱ्यावर उदभवणाऱ्या नुकसानकारक लाटा म्हणूनही ओळखले जाते
जागतिक त्सुनामी जागरूकता दिन साजरा करण्यामागे त्सुनामीच्या धोक्यांबद्दल आणि अशा धोक्यांचा सामना करताना अवलंबल्या जाणाऱ्या सावधगिरीच्या उपायांबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. नैसर्गिक आपत्ती राष्ट्रीय सीमा ओलांडून जाऊ शकतात हे ओळखून, संयुक्त राष्ट्रांनी ५ नोव्हेंबर हा जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस म्हणून स्थापन करण्याची शिफारस केली. त्सुनामीचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात; ज्यामुळे अनेकदा जीवितहानी होते. त्यासाठी त्सुनामीच्या आपत्तीबाबत जागरूकता आणि शिक्षण वाढवण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. त्सुनामीच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी लोकांमध्ये आवश्यक ज्ञान विकसित करणे हेच हा दिवस साजरा करण्याचे महत्त्व आणि उद्देश आहे
◆ जन्म
१. (१८४३) विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो
दरवर्षी यादिवशीच रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंताला विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मागील काही काळात रंगभूमीवर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोरंजनपर, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. १७० वर्षाची ही मराठी नाटकाची परंपरा आहे
२. (१९५५) दूरचित्रवाणीवरील भारतीय मुलाखतकार, पत्रकार करण थापर यांचा जन्म
त्यांनी द टाइम्स या इंग्लिश वृत्तपत्रातून पत्रकारितेतील कारकिर्दीस आरंभ केला. पुढे इ.स. १९८२ ते इ.स. १९९३ सालांदरम्यान अकरा वर्षे तो लंडन वीकेंड टेलिव्हिजन या दूरचित्रवाणी वाहिनीमध्ये टीव्ही-पत्रकारिता केली. त्यानंतर त्यांनी द हिंदुस्तान टाइम्स टेलिव्हिजन ग्रुप, होम टीव्ही, युनायटेड टेलिव्हिजन या कंपन्यांतून कामे केल्यावर इ.स. २००१ साली इन्फोटेन्मेंट टेलिव्हिजन ही स्वतःची चित्रवार्तानिर्मिती कंपनी स्थापली
● निधन
१. (१९९१) कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन
त्यांच्या ’किती रंगला खेळ’, ’चंदनाची उटी’, ’कशाला उद्याची बात’ इ. पन्नास कादंबर्या आणि ’झपूर्झा’, ’सावलीचा चटका’, ’मर्यादा’ इ. तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत
२. (२०११) भारतातील लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक भूपेन हजारिका यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment