दिनविशेष ०४ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. ०४ नोव्हेंबर
◆ जन्म
१. (१८४५) राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्म
ते भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक म्हणाले जाते. इ.स. १८७९ नंतर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामारी गावावर पहिला दरोडा टाकला
फडके यांनी नंतर महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला
२. (१८८९) प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रवर्तक जमनालाल बजाज यांचा जन्म
३. (१८९४) कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म
२१ वर्षांचे आप्पासाहेब गांधींचे विचार ऐकून इतके भारावून गेले की त्यांनी नोकरी सोडली आणि ते पूर्णकाळ समाजकार्य करण्यासाठी गांधींच्या आश्रमात दाखल झाले, आणि गांधीजींचा पत्रव्यवहार सांभाळू लागले. याच काळात गांधींनी १९१९ साली सुरू केलेल्या 'यंग इंडिया' या साप्ताहिकाची, साबरमती आश्रमात चालू असलेल्या राष्ट्रीय शाळेत शिकवण्याची आणि शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कामाची जबाबदारी आप्पासाहेब पटवर्धनांनी स्वीकारली. ग्रामपंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात यायच्या पूर्वी ग्रामपंचायतीच्याच धर्तीचे काम आप्पांनी सुरू केले होते. त्यानुसार रस्ते, विहिरी, जलसंधारण, प्राथमिक शिक्षण आदी कामे होऊ लागली
४. (१९३४) दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म
या भारतीय रंगभूमीवरील अभिनेत्री, दिग्दर्शिका आहेत. त्या आधुनिक मराठी रंगभूमीच्या आघाडीच्या प्रवर्तक असून 'रंगायन' चळवळीच्या अध्वर्यू आहेत. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासीयत आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment