दिनविशेष १० ऑक्टोबर

दिनविशेष 

दि. १० ऑक्टोबर

■ दिनविशेष 

१. जागतिक मानसिक आरोग्य दिन

जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १९९२ मध्ये वर्ल्ड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. १५० पेक्षा जास्त देशांमध्ये सदस्य आणि संपर्क असलेल्या जागतिक मानसिक आरोग्य संस्थचे हजारो समर्थक यादिवशी मानसिक आजार आणि जगभरातील लोकांच्या जीवनावर होणारे त्याचे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हा वार्षिक जागरूकता कार्यक्रम साजरा करतात. ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये हा दिवस मानसिक आरोग्य सप्ताहाचा भाग असतो


◆ जन्म

१. (१८४४) कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म

ते ब्रिटिश राजवटीतील एक भारतीय वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि राजकारणी होते. इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले ते पहिले भारतीय होते. ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष होते

२. (१८९९) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार, पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म 

ज्येष्ठ साम्यवादी नेते डांगे यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत मुंबईत कामगार चळवळ उभारली. एक निर्भिड संसदपटू म्हणूनही त्यांची ख्याती होती. संपूर्ण आयुष्य कामगारांच्या हितासाठी त्यांनी वाहून घेतले. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. डांगे हे अप्रतिम वक्ते होते. प्रारंभी शांत आणि सौम्य आवाजात सुरू झालेली त्यांची माहितीपूर्ण भाषणे प्रसंगी आणि अंती प्रक्षोभक असत

३. (१९०६) साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त व ए. सी. बेन्सन पदक सन्मानित लोकप्रिय लेखक आर. के. नारायण यांचा जन्म

नारायण यांना वाचनाची प्रचंड आवड होती. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी इंग्लिश लेखक डिकिन्स, आर्थर कॅनन डायल आणि थॉमस हार्डी यांच्या लेखनाचे वाचन केले. नारायण हे बारा वर्षाचे असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये भाग घेतला 

द गाईड, द वर्ल्ड ऑफ नागराज, वेटिंग फॉर महात्मा इ. कादंबर्‍या, तसेच ’मालगुडी डेज’, ए हॉर्स अँड टू गोट्‌स इत्यादी कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले. आर. के. नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील

४. (१९१०) हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म

ते मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच ९ डिसेंबर १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता

● निधन

१. (१९६४) प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते ’गुरूदत्त’ यांचे निधन

त्यांचे चौदहवी का चांद, कागज के फूल, सीआयडी, मि. अंड मिसेस ५५, आरपार आणि प्यासा इ. चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांच्या साहिब बिबी और गुलाम या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले 

२. (२०११) गझल गायक जगजीतसिंह यांचे निधन

ते ख्यातनाम भारतीय गझलगायक, संगीतकार होते. इ.स. १९७० आणि इ.स. १९८० च्या दशकात गायिका पत्‍नी चित्रा सिंह यांच्यासमवेत जगजीत यांनी केलेल्या गझलांच्या संगीत ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांना गझलसम्राट या नावाने ओळखले जाऊ लागले. पंजाबी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी या भाषांमधून जगजीतसिंह यांनी गायन केले

३. (२०२२) राजकारणी व समाजवादी पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे निधन

ते आजवर तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व १९९६ ते १९९८ दरम्यान केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री देखील राहिले होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर