दिनविशेष ०९ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. ०९ ऑक्टोबर

■ दिनविशेष

१. जागतिक टपाल दिन

दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक (World) टपाल दिन साजरा केला जातो. हा दिवस १९६९ मध्ये सुरू झाला, त्याच वर्षी पहिला जागतिक पोस्ट दिन साजरा करण्यात आला

◆ जन्म

१. (१६३५) छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक, मावळे वीर जिवा महाले यांचा जन्म

महाराजांचे प्राण वाचवल्यामुळे 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' अशी म्हण प्रचलित झाली

२. (१८७६) बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म

ते एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला

३. (१९३९) लेखक, नाटककार महेश एलकुंचवार यांचा जन्म

भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाटय लेखनात केलेले आहेत. ज्यात वास्तववादी , प्रतीकात्मक, अभिव्यक्तीवादी शैलीत त्यांनी रचना केलेल्या आहेत. सर्जनशीलता ही त्यांच्याकडे उपजत आहे. जीवनवादी नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जन्म ते मृत्यू यासारख्या विविध थीम त्यांनी मांडल्या आहेत. तीन ते चार दशकांहून अधिक काळ आधुनिक भारतीय रंगमंचावर त्यांचा प्रभाव आहे. १९६७ मध्ये सत्यकथा या प्रख्यात साहित्यिक मासिकात 'सुलतान' या त्यांच्या एकांकिकेच्या प्रकाशनानंतर महेश एलकुंचवार नाट्यसृष्टीत प्रकाशझोतात आले

● निधन

१. (१८९२) पत्रकार, समाजसुधारक लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे निधन

ते इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर या वृत्तपत्रात त्यांनी लोकहितवादी या नावाने 'शतपत्रे' लिहिली. समाजसुधारणा, अनिष्ट चाली, विद्याप्रसार या विषयावर त्यांनी १९ व्या शतकातील वैचारिक प्रबोधनाचा पाया घातला

लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता. आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकियांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकामध्ये महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे होत

समाजाचे उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे, सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं

२. (१९५५) संगीत नाटकांचे व पहिल्या मराठी बोलपटाचे शिल्पकार गोविंदराव टेंबे यांचे निधन

ते एक प्रख्यात मराठी संवादिनी वादक, संगीत रचनाकार, नट व साहित्यिक होते. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती

३. (१९६७) क्रांतिकारक राजकीय नेते कॉम्रेड अर्नेस्टो चे ग्वेरा यांचे निधन

हे अर्जेंटिनाचे मार्क्सवादी क्रांतिकारक, लेखक, गनिमी लढवय्यांचे म्होरके, राजकीय नेते आणि लष्करतज्ज्ञ होते. वैद्यकीय शिक्षण घेत असताना चे ग्वेरा यांनी लॅटिन अमेरिकेचे भ्रमण केले. त्यादरम्यान त्याला गरिबी व एलियनेशनचे विदारक दृश्य आढळले. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले. त्यांचे अनुभव व त्याच्या निरीक्षणांद्वारे ते ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचले की लॅटिन अमेरिकन प्रदेशात रुजलेली आर्थिक विषमता ही भांडवलशाही, एकाधिकारशाही, नव-वसाहतवाद व साम्राज्यवाद ह्या आंतरिक घटकांचा परिणाम आहे. ह्यावर एकमात्र उपाय म्हणजे जागतिक क्रांती आहे. ह्या विचारांनी त्याला ग्वाटेमालाच्या सामाजिक पुनर्रचनेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. हे पुनर्रचनेचे कार्य ग्वाटेमालाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॅकोबो आर्बेंझ ह्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते



४. (२००६) बहुजन समाज पक्षाचे नेते कांशीराम यांचे निधन

हे भारतीय राजकारणी होते. यांनी बहुजन समाज पक्ष हा पक्ष स्थापला. यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाने इ.स. १९९५ साली उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुका जिंकल्या व मायावतींच्या नेतृत्वाखाली नवे शासन स्थापले

५. भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर