दिनविशेष ०७ ऑक्टोबर

दिनविशेष 

दि. ०७ ऑक्टोबर

◆ जन्म 

१. (१८६६) आधुनिक मराठी काव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म

मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात

वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण ? नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत

२. (१९६०) लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म

जयपूर-अत्रौली, मेवाती आणि पतियाळा या घराण्याच्या प्रभावातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायनाची शैली तयार केली आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा हे उपशास्त्रीय गायन प्रकारसुद्धा त्या गातात. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक स्तोत्रे, स्तुती यांचे गायन केले आहे

३. (१९६६)  मराठी तसेच हिंदी भाषेतल्या चित्रपटांत व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून अभिनय करणाऱ्या मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा जन्म  

दूरदर्शनवरील सुरभि या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून त्या पहिल्यांदा प्रकाश झोतात आल्या. 'हम आपके है कौन' या हिंदी चित्रपटामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. त्या सोशल मिडीयावर सक्रिय असतात आणि विविध विषयांवर आपली मते मांडत असतात



● निधन

१. (२०१०) मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचे निधन

ते फिल्म्स डिव्हिजन या भारतीय शासनाच्या चित्रपटनिर्मिती करणाऱ्या संस्थेत इ.स. १९६१ सालापासून निर्मातापदावर होते. फिल्म्स डिव्हिजन संस्थेतील नोकरीत त्यांनी तीस माहितीपटांची निर्मिती केली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर