दिनविशेष ०४ ऑक्टोबर

दिनविशेष 

दि. ०४ ऑक्टोबर

★ महत्वपूर्ण घटना 

१. (१९१९) रयत शिक्षण संस्थेची स्थापना

४ ऑक्टोबर १९१९ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली

■ दिनविशेष 

१. जागतिक प्राणी दिवस ( World Animal Day )

सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. जगात अनेक ठिकाणी प्राणिमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे पूर्वीची घनदाट जंगल तुटून तिथे गावाची नगरे व नगरांची महानगरे होत असताना भरपूर प्रमाणात जंगल तोड झाली त्यामुळे प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही पाळीव प्राण्यांना अतिशय चांगले वागवले जाते तर काहींना दिवसभरात खायलाही मिळत नाही. ही समस्या जगापुढे आणण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. लहान- मोठ्या, पाळीव- भटक्या अशा सर्व प्राणिमात्रांचा यांमध्ये समावेश होतो

पर्यावरणासोबतच प्राण्यांचेही संरक्षण व्हावे यासाठी १९३१ मध्ये इटली देशातील फ्लोरेन्स शहरात एक पर्यावरण परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेत लोकांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत व्हावी यासाठी ४ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक प्राणी दिन' म्हणून पाळला जावा, असे ठरवण्यात आले. तेव्हापासून हा दिवस 'जागतिक प्राणी दिवस' म्हणून ओळखला जातो



◆ जन्म 

१. (१९३५) मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अरूण सरनाईक यांचा जन्म

ते मराठी चित्रपट अभिनेते होते. त्यांनी मराठी चित्रपट व नाटकांतून अभिनय केला. त्यांनी भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले

● निधन

१. (१९२१) गायक व नट केशवराव भोसले यांचे निधन

गायनकला व नाट्याभिनय या गुणांच्या आधारे त्यांनी मराठी रंगभूमीवर अढळ स्थान निर्माण केले. संगीत शहाशिवाजी नाटकातील शिवाजी महाराज व मानापमान नाटकातील धैर्यधर या त्यांच्या भूमिका त्याकाळी खूप गाजल्या

३. (१९८९) संगीतकार, गायक आणि नट संगीतभूषण राम मराठे यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर