दिनविशेष १३ ऑक्टोबर
दिनविशेष
दि. १३ ऑक्टोबर
★ महत्वपूर्ण घटना
१. (१८८४) लंडन शहराजवळील 'ग्रिनिच' या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली
◆ जन्म
१. (१९११) चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादा मुनी यांचा जन्म
बॉलिवूडचा पहिला 'अँटी हीरो' म्हणूनही अशोक कुमार ओळखले जात. अभिनयासोबत ते एक उत्तम गायक आणि चित्रकारदेखील होते
● निधन
१. (१९११) स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या पुरस्कर्त्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचे निधन
त्या आयरिश लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य याबद्दलची आस बंगाली युवकांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य निवेदितांनी हाती घेतले. स्वदेशीच्या आंदोलनात निवेदिताने स्वदेशाचा पुरस्कार करणारे लेख लिहिले. घरोघरी जाऊन स्वतः स्वदेशी वस्तुंचा प्रसारही केला. स्वदेशात व्यवसाय काढण्याच्या हेतुने, तरुणांनी परदेशी जाऊन प्रशिक्षण घ्यावे, ही कल्पना त्यांनी मांडली व अमलात आणली
२. (१९६८) संगीतकार वसंत प्रभू यांचे निधन
ते मराठी चित्रपटातील संगीतकार होते. प्रभूंनी संगीत दिलेले प्रसिद्ध गीत म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो', 'चाफा बोलेना', 'आली हासत पहिली रात', 'गंगा जमुना डोळ्यांत उभ्या' व 'कळा ज्या लागल्या जिवा होत
३. (१९८७) पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते व पटकथा लेखक किशोर कुमार यांचे निधन
त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. चलती का नाम गाडी सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच दूर गगन की छाँव में सारखे गंभीर चित्रपटही त्यांनी काढले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment