दिनविशेष १२ ऑक्टोबर

दिनविशेष 

दि. १२ ऑक्टोबर

★ महत्वपूर्ण घटना 

१. (२००५) १२ ऑक्टोबर २००५ रोजी माहितीचा अधिकार कायदा देशभरात लागू झाला


◆ जन्म 

१. (१९२२) शब्दांवर मनापासून प्रेम करणार्‍या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्‍या समर्थ कवयित्री आणि गीत लेखिका शांता शेळके यांचा जन्म

त्या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली

२. (१९३८) कवी, शायर, संवाद लेखक निदा फाजली यांचा जन्म 

जनप्रिय शायर नजीर अकबराबादी, नजीर बनारसी यांची शायरी पुढे नेणारे एक उर्दू शायर होते. हिंदी चित्रपटांचे ते संवादलेखक आणि गीतकार होते

● निधन

१. (१९६७) समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक राममनोहर लोहिया यांचे निधन

ते एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि समाजवादी राजकारणी होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर