दिनविशेष ०८ सप्टेंबर

दिनविशेष 

दि. ०८ सप्टेंबर

■ दिनविशेष 

१. जागतिक साक्षरता दिवस

८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता वाढावी हा, या दिवसाचा उद्देश आहे. कोणत्याही देशाच्या विकासासाठी साक्षरता अत्यंत महत्त्वाची असते. देशात जेवढे जास्त लोक सुशिक्षित असतील, तेवढी देशाची प्रगती होईल. साक्षरतेचा अर्थ आणि महत्त्व लोकांना कळावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो

साक्षरता दिन साजरा करण्याचा निर्णय युनेस्कोने ७ नोव्हेंबर १९६५ रोजी घेतला होता. त्यानंतर १९६६ साली पहिल्यांदा साक्षरता दिन साजरा करण्यात आला होता. हा दिवस साजरा करण्यासाठी ८ सप्टेंबर निश्चित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी ८ सप्टेंबरला साक्षरता दिन साजरा केला जातो 


◆ जन्म

१. (१९२६) संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांचा जन्म 

ते पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते

२. (१९३०) मराठी कवियत्री विमल लिमये यांचा जन्म 

त्या एक मराठी कवयित्री होत्या. 'घर असावे घरासारखे, नकोस नुसत्या भिंती’ ही विमल लिमये यांची प्रसिद्ध कविता श्रीधर फडके यांनी चाल लावून गायली आहे

● निधन

१. (१८५७) ब्रिटिशांच्या विरोधात उठावात भाग घेतल्याबद्दल सातारा येथील १७ जणांना गेंडा माळ येथील 'फाशीचा वड' येथे फाशी देण्यात आली

फाशीचा वड, सातारा राजद्रोहाचा खटला - १८५७

इंग्रज कंपनी सरकार विरुध्द सैन्याची जमवाजमव करणे, बंदुकीच्या गोळ्यांचे उत्पादन करणे, कंपनी सरकार विरोधी जनमानस भडकावणे, कंपनी सरकारची ठिकाणे लुटणे, जेलमधून कैदी सोडून देणे या आरोपावरून कट रचल्याचा १७ जणांविरोधी सातारा राजद्रोहाचा खटला १८५७ हा भरला होता. या खटल्याची सुनावणी दि २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर १८५७ या कालावधीत तीन जणांच्या न्यायदान मंडळपूढे झाली. चार्लस फोर्ब्स यांचे अध्यक्षतेखालील या मंडळाचे कर्नल जी माल्कम व कॅप्टन जेम्स रोझ हे दोन सदस्य होते

कॅप्टन जेम्स रोझ हे तेंव्हा सातारचे कलेक्टर होते. या मंडळाचे पुढे या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर सातारा राजद्रोहाचा खटल्यात १७ जणांना दोषी ठरवण्यात आले. सर्वजणांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली 

विशेष म्हणजे या खटल्यात सरकारने १७ साक्षीदार तपासले. देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी तीन प्रकारे करण्यात आली. ५ जणांना फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली. ६ जणांना बंदुकीच्या गोळ्यांनी मारण्याची शिक्षा सुनावली तर ६ जणांना तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा झाली. या खटल्याचा निकाल दि. ७ सप्टेंबर १८५७ रोजी देण्यात आला आणि शिक्षेची अंमलबजावणी ८ सप्टेंबर १८५७ रोजी सातारा जवळील गेंडा माळ येथील फाशीचा वड येथे करण्यात आली

देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये...
१) नारायण ( नाना ) बापू पावसकर ( सोनार ) 
२) मुन्नाजी उर्फ बापू ( नारायण) बाबर ( भांदिर्गे )
३) केशव निळकंठ चित्रे ( रंगो बापूजी गुप्ते यांचे मेव्हणे )
४) शिवराम मोरेश्वर कुलकर्णी ( बहुश्रुत )
५) सखाराम बळवंत चव्हाण
६) रामजी बापूजी चव्हाण उर्फ रामसिंग
७) बाब्या रंगू ( कांगु ) शिरतोडे
८) बाब्या नाथ्या गायकवाड ( मांग )
९) येशा नाथ्या गायकवाड ( मांग )
१०) नाम्या नायकू चव्हाण
११) शिव्या सोमाजी पाटोळे
१२) पार्वती विठोजी ( गणेश ) साळोखा
१३) विठ्ठल कोंडी वाकनीस
१४) गणेश सखाराम कारखानीस
१५) पालटू येसू घाटगे
१६) सीताराम रंगराव गुप्ते ( रंगो बापूजी गुप्ते यांचे चिरंजीव )
१७) नाना उमाजी मुडके
यांचा समावेश आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर