दिनविशेष ०७ सप्टेंबर

दिनविशेष 

दि. ०७ सप्टेंबर

■ दिनविशेष 

१. (१९९८) ७ सप्टेंबर १९९८ गूगल स्थापना 

गूगल कंपनी विशेषतः आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. गूगलची स्थापना लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांनी ७ सप्टेंबर १९९८ रोजी केली. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे
 
◆ जन्म  

१. (१७९१) भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी ब्रिटीशाविरूध्द लढणारे महाराष्ट्रातील आंद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांचा जन्म 

ते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते. भारतीय स्वातंत्र लढ्यातील सशत्र क्रांतीचे प्रथम जनक त्यांना मानले जाते. १८ व्या शतकात त्यांनी इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडले होते. त्यांचा लढा वर्षोनुवर्षे भारतीयांसाठी एक प्रेरणास्रोत राहील


२. (१८२२) प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी भाऊ दाजी लाड यांचा जन्म

हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. ज्ञान प्रसारक सभा ही संघटना डॉ भाऊ दाजी लाड यांनी विकसित केली

३. (१९३३) मॅगसेसे पुरस्कार विजेत्या, समाजसेविका इला भट्ट यांचा जन्म

या भारतातील असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य इला भट यांनी केले आहे

इ.स. १९७२ साली इला भट यांनी असंघटित महिला कामगारांसाठी `सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन' (सेवा) ही संघटना स्थापन केली. प्रस्तावित राष्ट्रीय महिला आयोगाची उद्दिष्टे आणि कार्य ठरविण्याची जबाबदारी इला भट यांच्यावर सोपविलेली होती. त्यासाठी त्यांनी भारतभरातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या भेटी घेऊन श्रमशक्ती अहवाल तयार केला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर