दिनविशेष ०४ सप्टेंबर
दिनविशेष
दि. ०४ सप्टेंबर
◆ जन्म
१. (१८२५) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेत स्थान मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती, पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म
ते पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील नेते होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसद सदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते
२. (१९३७) साहित्यिक आणि समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म
ते साहित्यिक आणि समीक्षक होते. दीर्घकाळ साहित्याच्या, समीक्षेच्या क्षेत्रांत घालवल्यावर व पत्रकारिता केल्यावरही त्यांचा 'स्नेहशील' या शब्दाने गौरव होत असे. असे भाग्य फारच थोड्या लोकांना लाभते
सन १९६८ च्या सुमारास सारडा हे 'साधना'चे अतिथी संपादक होते, तेव्हा त्यांच्या काळात त्यांनी ह. मो. मराठे यांची 'निष्पर्ण वृक्षाखाली' ही कादंबरी प्रकाशित केली. भा. रा. भागवत यांच्या 'फास्टर फेणे'च्या निर्मितीमागे शंकर सारडा यांची प्रेरणा होती. प्रत्येक साहित्य संमेलनाला हजर लावून त्याचे वृत्तांकन करणारा सारडांसारखा पत्रकार विरळाच
सारडा हे पत्रकार, समीक्षक आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध होते. किशोरवयापासूनच त्यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्र टाइम्सची रविवार पुरवणी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, साधना, दैनिक देशदूत, लोकमित्र पुरवणी, लोकमत रविवार पुरवणी, ग्रंथजगत अशा विविध वृत्तपत्रांमधील कामाचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे. विशेषतः महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीतून सारडा यांनी ‘चक्र,’ ‘माहीमची खाडी,’ ‘वासुनाका’ अशा पुस्तकांवर लिहिलेला विस्तृत लेख आणि इतरही महत्त्वाच्या कविता-कादंबऱ्यांची केलेली परीक्षणे गाजली होती. ‘मटा’ सुरू झाल्यानंतर त्याचं रूप घडवण्यात संपादक द्वा. भ. कर्णिकांना सारडा यांची चांगलीच साथ लाभली होती. त्यांनी सुरुवातीच्या काळात सदानंद रेगे, वसंत बापट, वा. ल. कुलकर्णी यांच्यासारख्यांना ‘मटा’शी जोडण्याचं महत्त्वाचे काम केले होते. सारडा यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांचे समीक्षण केले आहे. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केला आहे
३. (१९५२) भारतीय सिने अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्म
ते एक भारतीय सिने अभिनेते व दिग्दर्शक होते. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment