दिनविशेष २९ सप्टेंबर
दिनविशेष
दि. २९ सप्टेंबर
■ दिनविशष
१. जागतिक ह्दय दिवस ( World Heart Day )
जागतिक हृदय दिन दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. हे संपूर्ण शरीर कार्य करतं. आपण हृदयविकारानं ग्रस्त असल्यास, त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळं हृदय निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या काळात तर तरुणही हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळं हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे
जागतिक हृदय दिनाचा उद्देश हृदयाशी संबंधित आजारांबद्दल लोकांना जागरूक करणं हा आहे. आज जागतिक लोकसंख्येला प्रभावित करणाऱ्या हृदयाशी संबंधित समस्या आणि आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी WHF ने या दिवसाची स्थापना केली. लोकांना जागतिक हृदय दिनाविषयी माहिती असणं खूप महत्वाचं आहे, कारण लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता कमी आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे सर्व वयोगटातील लोकांना हृदयाशी संबंधित आजार होतात. त्यामुळं हा दिवस लोकांना हृदयाशी संबंधित आजारांबाबत जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो
२. आंतरराष्ट्रीय अन्न नासाडी जागृती दिवस
२९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय अन्न नासाडी जागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी लोकांना जागरूक केले जाते
◆ जन्म
१. (१९३२) मराठी साहित्यिक, मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे जनक हमीद दलवाई यांचा जन्म
हमीद दलवाई हे रॅशनल भूमिका घेणारे कृतीशील विचारवंत होते. राष्ट्रीय एकात्मता हे अंतिम उद्दिष्ट मानणारे, मुस्लिम समाजातील सुधारणांना बळ देण्यासाठी निर्भीडपणे अनेक प्रबोधन-कृती कार्यक्रम राबविणारे सामाजिक क्रांतिकारक हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून वैचारिक लढा उभारला. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती. परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या या मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियात त्यांना मानाचे स्थान आहे
मुस्लिम समाजात प्रबोधन घडवून आणण्यासाठी त्यांनी 'मुस्लिम सत्यशोधक मंडळ'ची स्थापना केली. मुस्लिमांमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व यामुळे स्त्रियांची होणारी घुसमट, याविरूद्ध त्यांनी लढा दिला. 'मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया' हे त्यांचे पुस्तक, 'लाट' कथासंग्रह व 'इंधन' ही कादंबरी प्रसिद्ध आहे
२. (१९३२) विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद अली यांचा जन्म
बॉलिवूडचे एकेकाळचे सुप्रसिद्ध कॉमेडियन अशी ओळख असणाऱ्या मेहमूद अली यांची त्याकाळी इतकी क्रेझ होती की दिग्दर्शकांना हिरोपेक्षाही जास्त पैसे देऊन त्यांना कास्ट करावे लागायचे
भूत बांगला, पडोसन, बॉम्बे टू गोवा, गुमनाम, कुंवरा बाप हे त्यांचे काही संस्मरणीय चित्रपट आहेत. त्यांनी त्यांच्या काळातील जवळपास सर्वच अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत काम केले होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment