दिनविशेष २६ सप्टेंबर
दिनविशेष
दि. २६ सप्टेंबर
■ दिनविशेष
१. जागतिक परमाणू निशस्त्रीकरण दिन
दरवर्षी २६ सप्टेंबर हा दिवस जागतिक परमाणू निशस्त्रीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. परमाणू हत्यारांद्वारे मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या संकटांना दूर करण्यासाठी परमाणू निशस्त्रीकरण दिन साजरा केला जातो. याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात
◆ जन्म
१. (१८२०) पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचा जन्म
ते बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक होते
२. (१९२३) भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते देव आनंद यांचा जन्म
सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. भारताच्या केंद्रशासनाने इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले. २०२३ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे
३. (१९३२) भारताचे माजी पंतप्रधान, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अर्थतज्ञ, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गवर्नर डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म
१९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली. १९९१ नंतर भारतात नवअर्थव्यवस्थेचे युग सुरू झाले
● निधन
१. (१९५६) किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक मराठी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन
शेतकऱ्यांसाठी त्यांनी बनविलेला लोखंडी नांगर हे किर्लोस्कर समूहाचे पाहिले उत्पादन. महाराष्ट्राचे हेन्री फोर्ड म्हणून ते ओळखले जातात
२. (१९९६) जेष्ठ नाटककार, अष्टपैलू पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष विद्याधर गोखले यांचे निधन
ते मराठी पत्रकार व संगीत नाटककार होते. मराठी वर्तमानपत्र दैनिक लोकसत्ताचे ते संपादक होते. विद्याधर गोखले यांच्या वरिल संस्कार हे पत्रकारिता यालाच पोषक होते. विद्येवर,ज्ञानावर त्यांचा विश्वास होता. ते व्यासंगी होते
विद्याधर गोखले यांचे लेखन मात्र गांभीर्यापेक्षा रंजकतेकडे अधिक झुकणारे होते. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत लेखन सालंकृत करण्यावर त्यांचा अधिक भर असे. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यातील वचने व कल्पना ते आपल्या अग्रलेखात वापरत. सरळ, सुबोध अशा त्यांच्या लेखनात विनोदाचा शिडकावाही असे. प्रक्षोभक लिहिण्यापेक्षा मुद्द्यांकडे, भाषेच्या व शब्दांच्या नेटक्या वापराकडे संपादकाने लक्ष द्यायला हवे, असे त्यांचे मत होते
३. (२००२) मराठी संगीतकार आणि गायक राम फाटक यांचे निधन
पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment