दिनविशेष २३ सप्टेंबर
दिनविशेष
दि. २३ सप्टेंबर
■ दिनविशेष
१. जागतिक सांकेतिक भाषा दिवस
शब्दांपलीकडच्या भाषेने जगाशी संवाद साधणा-या कर्णबधीर समुदायाच्या सांकेतिक भाषेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सर्व कर्णबधिर लोकांच्या आणि इतर सांकेतिक भाषा वापरकर्त्यांच्या भाषिक ओळख आणि सांस्कृतिक विविधतेचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी जागतिक सांकेतिक भाषा दिन साजरा केला जातो
◆ जन्म
१ . (१९०३) 'चले जाव' घोषणा देणारे, समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, युसुफ मेहर अली यांचा जन्म
ते भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. मेहरअली फार कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. तरुण वयात ते ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी विरोधात रस्त्यावर उतरले. कॉलेजमध्ये असताना ते बॉम्बे प्रेसीडेंसी युथ लिग संघटनेत सामील झाले. ते सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांनी १९४२ च्या चले जाव आंदोलनात महत्त्वाची भूमिका राबवली होती. 'चले जाव' ही घोषणादेखील त्यांनीच दिली होती
२ . (१९०८) साहित्यकार, राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म
आधुनिक काळातील सर्वोत्तम कवी म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवाद किंवा राष्ट्रवाद हे त्यांच्या कवितेचे मूळ गृहीत धरून त्यांना 'युग-चरण' आणि 'काळाचा बार' अशी नावे दिली आहेत. 'दिनकर' हे स्वातंत्र्यापूर्वी बंडखोर कवी म्हणून प्रस्थापित झाले आणि स्वातंत्र्यानंतर ते 'राष्ट्रकवी' म्हणून ओळखले जाऊ लागले. ते चित्रकार कवींच्या पहिल्या पिढीतील कवी होते. त्यांच्या कवितांमध्ये एकीकडे ऊर्जा, विद्रोह, राग आणि क्रांतीची हाक आहे तर दुसरीकडे हळुवार सौंदर्यात्मक भावनांची अभिव्यक्ती आहे. कुरुक्षेत्र आणि उर्वशी या त्यांच्या कृतींमध्ये या दोन प्रवृत्तींचा कळस आपल्याला आढळतो
रामधारी सिंह 'दिनकर' : कवि जो सत्ता के करीब रहकर भी कभी जनता से दूर नहीं हुआ
रामधारी सिंह ‘दिनकर’ हिंदी के उन गिने-चुने कवियों में से हैं जिनकी पंक्तियों को किसानों और मजदूरों ने भी कहावतों की तरह इस्तेमाल किया...
https://amp.satyagrah.scroll.in/article/100525/raamdhaarii-sinh-dinkr-aise-kvi-the-jo-sttaa-ke-kriib-rhkr-bhii-kbhii-jntaa-se-duur-nhiin-hue
३. (१९१९) शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म
ते शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी विचारवंत, पुणे विद्यापीठाचे दहावे कुलगुरू आणि संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते
४. (१९५०) डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक, समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म
ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे
● निधन
१. (१९३९) आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मुंड फ्रॉइड यांचे निधन
सिग्मुंड फ्रॉइड हे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केले
वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते, ती मानवातही असणार आहे. त्यासाठी लैंगिक आकर्षण नैसर्गिकरीत्या प्रत्येक व्यक्तीत असायला असणार. असे लैंगिक आकर्षणाचे काही कारणाने प्रकटीकरण होऊ शकले नाही तर त्याचा मानवी व्यक्तीच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो. असा विचार त्याने मांडला
२. (१९६४) नाटककार, कादंबरीकार, लेखक भार्गरराव विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन
वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते 'ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबऱ्या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत
बंगालीतले उत्तम साहित्य त्यांनी मराठीत आणले. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबऱ्यांच्या भा.वि, वरेरकरांनी केलेल्या अनुवादाची ४० पुस्तके वा.वि. भट यांनी प्रकाशित केली. ’एकविंशती’ या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांच्या वरेरकरांनी अनुवादित केलेल्या २१ कथा आहेत
इ.स. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, इ.स. १९१८ रोजी आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते
३. (२०२१) क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांती विरांगना हौसा आक्का पाटील यांचे निधन
हौसा आक्कांनी प्रतिसरकार चळवळीत, स्वातंत्र्य आंदोलनात महिला संघटनाच्या माध्यमातून योगदान दिले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment