दिनविशेष ०३ सप्टेंबर

दिनविशेष

दि. ०३ सप्टेंबर

◆ जन्म 

१. (१९२३) महाराष्ट्र शाहीर कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म 

ते एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले


२. (१९३५) शेतकरी चळवळीतील नेते, लेखक शरद जोशी यांचा जन्म 

१९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, ऊस, तंबाखू, भात, कापूस, इत्यादी पिके पिकविणाऱ्या व दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने, वगैरे त्यांनी केले

● निधन

१. (१९५८) निसर्ग कवी, कोकणकवी माधव केशव काटदरे यांचे निधन 

माधव काटदरे यांनी निसर्गकवितांशिवाय काही ऐतिहासिक कविताही लिहिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज असे त्यांच्या कवितांचे विषय होते. याशिवाय काटदऱ्यांनी शिशुगीते व काही विनोदी कविताही लिहिल्या

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर