दिनविशेष १८ सप्टेंबर
दिनविशेष
दि. १८ सप्टेंबर
◆ जन्म
१. (१९०५) मराठी अभिनेते विष्णूपंत जोग यांचा जन्म
१९३५ सालापर्यंत विष्णुपंत जोग नाटकातून छोट्या मोठ्या भूमिका करीत व शास्त्रशुद्ध पद्धतीने गाणे शिकले नसूनही नाट्यगीते म्हणत व त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असे. या काळात चित्रपटांचा जमाना चांगला स्थिरावत चालला होता. विष्णुपंतांचे मेहुणे नटवर्य नानासाहेब फाटक, त्यांनीच विष्णुपंत जोग यांना आग्रहाने कोल्हापूर येथे बोलावून घेतले व शालिनी सिनेटोनच्या ‘उषा’, ‘प्रतिभा’, ‘सावकारी पाश’ या चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिका मिळवून दिल्या. विष्णुपंत जोग यांनी जवळजवळ ७५ हिंदी/मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत
२. (१९५०) अभिनेत्री शबाना आझमी यांचा जन्म
त्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी सन १९७४ मध्ये आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. त्यांनी समांतर सिनेमातही कामे केली आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांना सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ५ वेळा पुरस्कार मिळाला आहे व अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. सन १९८८ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले
● निधन
१. (२००२) मृत्युंजयकार, साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन
ते मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली 'मृत्युंजय' ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार म्हणून ओळखले जातात. ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. शिवाजी सावंत यांची कादंबऱ्यांसहित अन्य पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत
२. (२००४) समीक्षक भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन
फडके मराठीतील ख्यातनाम समीक्षक होते त्यांची समीक्षेवरील अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी ‘कथाकार खानोलकर’ (१९६९), ‘दलित साहित्य: वेदना आणि विद्रोह’ (१९७७), ‘मराठी लेखिका: चिंता आणि चिंतन’ (१९८०) ही काही प्रसिद्ध पुस्तके असून त्यामुळे त्यांच्यावर ‘समीक्षक’ ही मुद्रा उमटली. त्यांची समीक्षा मर्मग्राही, सामाजिक भान जागे करणारी आणि काही प्रमाणात प्रेरणा देणारी होती. दलित साहित्याचा त्यांनी वेळोवेळी घेतलेला धांडोळा साक्षेपी समीक्षेचा एक चांगला प्रकार होता
त्यांनी अरविंद गोखले यांच्या कथा संपादित केल्या आहेत आणि कथांची अन्य संपादित पुस्तके ही त्यांच्या नावावर आहेत. डॉ. आंबेडकरांवर त्यांनी चरित्रपर लेखन केले. १९७३ ते १९७६ या काळात मराठी साहित्य पत्रिकाचे (पुणे) ते संपादक होते. त्या काळातील नामवंत समीक्षकांचे लेखन प्रसिद्ध करून त्यांनी पत्रिकेचा दर्जा उंचावला. त्यांची संपादकीय व समीक्षकीय दृष्टी चिकित्सक होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment