दिनविशेष १५ सप्टेंबर
दिनविशेष
दि. १५ सप्टेंबर
■ दिनविशेष
१. जागतिक लोकशाही दिन
दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक लोकशाही दिन’ म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात २००७ मध्ये झाली. संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या या दिवसासाठी दरवर्षी एक संकल्पना असते
२. राष्ट्रीय अभियंता दिन
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन भारत सरकारने १९६८ साली 'अभियंता दिन' म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी १५ सप्टेंबरला राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो
ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते. त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती करून देशाला नवे रूप दिले. देशभरात बांधलेली अनेक नदीवरील धरणे आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच देशातील पाण्याचा प्रश्न सुटला
३. दूरदर्शन स्थापना दिन
दूरदर्शवरून पहिले प्रसारण १५ सप्टेंबर १९५९ रोजी आकाशवाणी भवन नवी दिल्ली, या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले. म्हणून हा दिवस दूरदर्शन स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो
◆ जन्म
१. (१८६१) भारतातील महान अभियंते भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म
२. (१९०९) स्वातंत्र्यसैनिक आणि सहकारी चळवळीतील नेते रत्नप्पा कुंभार यांचा जन्म
ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते
३. (१९२१) रंगभूमीवरील अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म
ते मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते होते. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी ४० नाटकांत एकूण ५० भूमिका साकार केल्या. तुझे आहे तुजपाशी या नाटकातील 'काकाजी' ही भूमिका त्यांनी अजरामर केली
४. (१९३५) सुप्रसिद्ध मराठी साहित्यक 'बलतू'कार दगडू पवार तथा दया पवार यांचा जन्म
मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे. 'जागल्या' या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली
● निधन
१. (२००८) साहित्यक, समीक्षक आणि अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन
ते मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्य समीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली. कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment