दिनविशेष १३ सप्टेंबर

दिनविशेष 

दि. १३ सप्टेंबर

◆ जन्म 

१. (१९२८) सुप्रसिद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन 

श्रीधर पाठकांची मौलिक काव्यरचना 'जगत सचाई सार' (१८८७) ही असून त्यात जीवनकडे पाहण्याचा गंभीर व कर्मप्रधान दृष्टिकोन परिणामकारकपणे प्रकट झाला आहे. पाठकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाविषयीचे त्यांचे अकृत्रिम आकर्षण व त्याकडे पाहण्याचा त्यांचा अभिनव दृष्टिकोन

निसर्गसौंदर्य, देशभक्ती व समाजसुधारणा हे विषय त्यांच्या काव्यात प्रामुख्याने आले आहेत. हिंदी खडी बोलीचा काव्यात उपयोग करण्यास त्यांनी विशेष हातभार लावला, हे त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणता येईल. ते वृत्तीने स्वच्छंदतावादी असले, तरी त्या वेळच्या परंपरावादी विचारांचा पगडाही त्यांच्या मनावर खूप होता. निसर्गप्रेम, खडी बोलीचा उपयोग आणि स्वच्छांदतावादी वृत्ती या तीन वैशिष्ट्यांमुळे ते भारतेंदु युग, द्विवेदी युग व पुढचे छायावादी युग यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात

२. (१९३२) अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म


अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जातात. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत

तरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. इ.स. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारताच्या व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत
 
३. (१९४६) जेष्ठ मराठी कलाकार उषा नाडकर्णी यांचा जन्म

उषा नाडकर्णी या मराठी नाटके व चित्रपटांमधील अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी हिंदी चित्रपटांमधूनही अभिनय केला आहे

● निधन

१. (१९७१) मराठी चित्रपट व रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेते आणि नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन

कीचकवध हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक महाराष्ट्र नाटक मंडळीच्या रंगभूमीवर २२ फेब्रुवारी १९०७ रोजी आले तेव्हापासून त्या नाटकाचा व त्या नाटकातील गणपतराव भागवत यांच्या कीचकाच्या भूमिकेचा अतिशय बोलबाला झाला होता. कीचकाची पत्नी रत्नप्रभा, हिची भूमिका करण्याची संधी केशवरावांना लाभली. त्यामुळे त्यांना भागवतांच्या अभिनयकौशल्याचे अगदी जवळून दर्शन घडले. कोणत्याही भूमिकेचा कसा आणि किती विचार केला पाहिजे, नटाच्या जीवनात शिस्तीची आणि चारित्र्याची किती गरज असते आणि नटाने प्रत्येक भूमिका रंगभूमीवर कशी जगली पाहिजे, याचे शिक्षण केशवरावांना भागवतांच्या सान्निध्यात मिळाले. महाराष्ट्र नाटक मंडळीचे मालक त्र्यंबकराव कारखानीस आणि नाटककार खाडिलकर या दोघांना केशवराव गुरूस्थानी मानत

महाराष्ट्र नाटक मंडळीच्या नाटकांत केशवरावांनी काही स्त्रीभूमिका केल्यानंतर ते नायकाच्या भूमिका करू लागले. प्रेमसंन्यास नाटकातील जयंत (१९१२), सत्वपरीक्षा नाटकातील हरिश्चंद्र (१९१४), पुण्यप्रभाव नाटकातील वृंदावन (१९१६) आणि विचित्रलीला नाटकातील विचित्र (१९१६) या त्यांपैकी काही ठळक भूमिका होत. केशवरावांचा विवाह रमाबाई यांच्याबरोबर १९१७ साली झाला. रमाबाईंची सोबत केशवरावांना ३० जानेवारी १९६८ पर्यंत लाभली. आपल्या सुखी आणि नेटक्या संसाराचे सारे श्रेय केशवराव रमाबाईंना देत असत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर