दिनविशेष ०५ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ०५ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१९३३) लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विजया राजाध्यक्ष यांचा जन्म
विजया राजाध्यक्ष महाविद्यालयात असताना त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. अधांतर हा त्यांचा पहिला संग्रह होता. त्यानंतर ‘विदेही’, ‘अनोळखी’, ‘अकल्पित’, ‘हुंकार’, ‘अखेरचे पर्व’, ‘उत्तरार्ध’, ‘आधी...नंतर’ असे त्यांचे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विजयाबाईंची कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवेशातील स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते. विशिष्ट कालखंडातील प्रश्नांपेक्षा जन्म व मृत्यू या टोकांतील जीवनाचे प्रयोजन, स्त्री-पुरुषांची आणि आई-मूल, पती-पत्नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ, यांचा परोपरीने वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते. तरल, काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. समीक्षात्मक लेखनात ‘कवितारती’, ‘जिव्हार’ ‘स्वानंदाचे आदिमाया’, ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’, ‘संवाद’ ही पुस्तके प्रख्यात आहेत. ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ या ग्रंथाला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविले आहे. इ.स. २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या ७४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी भूषविले
● मृत्यू
१. (१९९२) स्वातंत्र्यसैनिक, १९४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन
त्यांनी भारत छोडो चळवळीत प्रमुख सहभाग घेतला.१९४२ नंतर अनेक वर्षे दक्षिण महाराष्ट्रात भूमिगत राहून कार्य करणारे अच्युतराव पटवर्धन इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाहीत
२. (२००१) मराठी संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचे निधन
कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता. त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकांतली गाणी अजरामर झाली. ज्योत्स्ना भोळे यांचे संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे भैरवी रागातील गाणे फार गाजले
#vishlinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment