दिनविशेष ३१ ऑगस्ट

दिनविशेष 

दि. ३१ ऑगस्ट

◆ जन्म 

१. (१९०७) फिलीपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचा जन्म

रॅमन डेल फिएर्रो मॅगसेसे एक फिलिपिनो राजकारणी होते. ते फिलिपाइन्सचे सातवे अध्यक्ष होते. कम्युनिस्ट हुकबालाहाप (हुक) चळवळीचा पराजय केल्याबद्दल ते ओळखले जातात 

आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं


२. (१९१९) पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म

त्या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे

अमृता प्रीतम यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

३. (१९४०) ख्यातनाम कादंबरीकार, लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म 

ते मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. छावा आणि युगंधर ह्या त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत

● निधन

१. (१९७३) शिक्षण प्रवर्तक, भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ञ व बालक मंदिराच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन

त्या एक मराठी भाषक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर