दिनविशेष २६ ऑगस्ट
दिनविशेष
दि. २६ ऑगस्ट
■ दिनविशेष
१. जागतिक श्वान दिन
२६ ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक श्वान दिन म्हणून साजरा केला जातो. ज्याची सुरुवात २००४ साली कॉलीन पायज यांनी केली होती. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांनी श्वानांचा आदर करावा आणि त्यांना दत्तक घेण्यास प्रोत्साहित करावे हा आहे हा आहे
◆ जन्म
१. (१९१०) नोबेल व भारतरत्न पुरस्कार प्राप्त समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म
२. (१९२२) समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, लेखक ग. प्र. प्रधान यांचा जन्म
समाजकारण, राजकारण, साहित्य, शिक्षण अशा अनेक प्रांतात आपला प्रभाव पाडणारे गणेश प्रभाकर तथा ग. प्र. प्रधान यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सभापतीही राहिले
प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केले आहे. ते साधना साप्ताहिकाचे मानद संपादक होते. साने गुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे
३. (१९४४) सामाजिक कार्यकर्ते, मराठी लेखक अनिल अवचट यांचा जन्म
त्यांनी आपल्या पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी पुण्यात 'मुक्तांगण' हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. तसेच पश्चिम भारताच्या पातळीवर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू केले आणि महिलांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. 'मुक्तांगणाची गोष्ठ' आणि 'गर्द ऐसी' ही दोन पुस्तके त्यांनी मुक्तांगण आणि तेथील रुग्णांचे अनुभव यावर लिहिली आहेत
● निधन
१. (१९४८) नाटककार तथा नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे निधन
कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे मराठी नाटककार होते. पारतंत्र्याच्या काळात पत्रकार म्हणून ते आपले विचार 'केसरी'च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले होते. पण त्याच काळात खाडिलकरांनी 'स्वयंवर' 'मानापमान' सारखी ललित नाटके लिहिली. ते ‘नाट्यचार्य खाडिलकर’ म्हणून प्रसिद्ध आहेत
२. (२०१२) चित्रपट अभिनेते, स्वातंत्र्य सैनिक ए. के. हनगल यांचे निधन
ते हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चरित्र अभिनेते होते. हंगल यांना २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'नमक हराम', 'शोले', 'शौकीन', 'आइना' असे अनेक त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. इतना सन्नाटा क्यों है भाई?, या संवादातून शोलेमधील रहीम चाचाची त्यांची भूमिका अजरामर झाली. त्यांना त्यांच्या चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी पद्मभूषण या सन्मानानी गौरवण्यात आले होते . स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला होता
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment