दिनविशेष २४ ऑगस्ट
दिनविशेष
दि. २४ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१८८०) आशयसंपन्न काव्यनिर्मिती करणाऱ्या प्रतिभावान कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म
त्यांच्या कविता वऱ्हाडी - खानदेशी भाषेत रचिलेल्या आहेत
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा ।
जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
२. (१९०८) क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म
३. (१९७७) चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि मराठी कवी नागराज मंजुळे यांचा जन्म
पिस्तुल्या या लघुपटाचे आणि फॅंड्री, सैराट व झुंड या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शक केले आहे
● निधन
१. (२०१८) मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन
'मोरुची मावशी' या नाटकातील त्यांचे स्त्री पात्र लोकप्रिय ठरलं. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment