दिनविशेष २३ ऑगस्ट

दिनविशेष 


दि. २३ ऑगस्ट


■ दिनविशेष 


१. जागतिक वडापाव दिवस


दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. वडापाव हा महाराष्ट्रातील लोकांचा आवडता खाद्यपदार्थ आहे


◆ जन्म 


१. (१९१८) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, श्रेष्ठ मराठी कवी गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म


ते मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले


● निधन


१. (२०१८) पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे निधन


ते एक भारतीय पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक आणि युनायटेड किंगडममधील भारताचे माजी उच्चायुक्त होते. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीसाठी ते डाव्या विचारसरणीचे राजकीय समालोचक म्हणून प्रसिद्ध होते. १९९७ मध्ये त्यांना भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणूनही नामांकन मिळाले होते


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर