दिनविशेष ०५ जुलै

दिनविशेष

दि. ०५ जुलै

◆ जन्म 

१. (१९२०) मराठी लेखक, साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म

आनंद साधले हे मराठीतले एक विद्वान लेखक होते. 'हा जय नावाचा इतिहास' ह्या युधिष्ठिराला महाभारताचा खलनायक ठरवणाऱ्या कादंबरीमुळे आनंद साधले यांना सुरुवातीला कुप्रसिद्धी, पण नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली. ह्या कादंबरीचे क्रमश: प्रकाशन करणे मराठीतील अनेक मासिकांनी नाकारले. शेवटी 'दीपावली'ने त्यांच्या मासिक अंकांत ती प्रसिद्ध करायला सुरुवात केली. महाभारताच्या अनेक अभ्यासकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली, पण सामान्य वाचकांनी तिला डोक्यावर घेतली. कादंबरी जसजशी पुढॆ सरकत गेली तसतसे तिचे विरोधक हळूहळू थंडावले


● निधन

१. (१९९६) मराठीतील प्रसिद्ध रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण तथा बाबूराव अर्नाळकर यांचे निधन

ते बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक होते. मॅट्रिकच्या वर्गात असताना शाळा सोडलेले बाबूराव मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खऱ्या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. चार आणे मालांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले

#visahlinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर