दिनविशेष ०४ जुलै

दिनविशेष

दि. ०४ जुलै

◆ जन्म 

१. (१९१४) जनकवी, भावगीत लेखक पी. सावळाराम यांचा जन्म

भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता. सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्याऱ्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते

● निधन

१. (१७२९) मराठा आरमार प्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन

आंग्रे १६ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांना आरमार प्रमुख पदी नेमणुक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला

२. (१९०२) भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे स्वामी विवेकानंद यांचे निधन

ते एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो... या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत. जे त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत केले होते


३. (१९६३) भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन

ते एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. ते महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी होते. ज्या ध्वजावर भारतीय राष्ट्रध्वज आधारित होता त्याचे ते डिझायनर होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर