दिनविशेष २९ जुलै
दिनविशेष
दि. २९ जुलै
■ दिनविशेष
■ जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day)
असं म्हटलं जातं की वाघ जगला तर जंगल जगेल आणि पर्यायाने निसर्गातील अन्न साखळी कायम राहिल. पण नैसर्गिक अधिवास नष्टता, अवैध शिकार, तस्करी, जंगलतोड आणि इतर कारणांमुळे वाघांची संख्या कमी झाली. त्यामुळे त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो
रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये २९ जुलै २०१० साली झालेल्या व्याघ्र संवर्धनाच्या शिखर परिषदेत जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे असा आहे. त्या माध्यमातून मानव-वाघ संघर्षाची दरी कमी करणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे साध्य केले जाऊ शकेल
२०२२ सालच्या व्याघ्र जनगणनेमध्ये भारतात ३,१६७ वाघ असल्याचं स्पष्ट झालं आहे. २००६ ते २०१८ या काळात भारतामध्ये वाघांच्या संरक्षणासंबंधी करण्यात आलेल्या कामांमुळे वाघांची संख्या जवळपास दुप्पट म्हणजे १४०० वरून ३००० पर्यंत पोहोचली होती
भारतात एकूण ५३ व्याघ्र संरक्षित क्षेत्रे आहेत. जगातल्या ७५ टक्के वाघांचे वास्तव्य हे भारतात आहे. भारतात सध्या सर्वाधिक वाघांची संख्या ही मध्य प्रदेशमध्ये आहे. त्या खालोखाल कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम, केरळ, राजस्थान, ओडिशा आणि छत्तीसगडचा क्रमांक लागतो
मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे ५२६ वाघ आहेत, त्या खालोखाल कर्नाटकमध्ये ५२४ वाघ आहेत. महाराष्ट्राचा या यादीमध्ये चौथा क्रमांक लागत असून राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघ आहेत
भारतात सापडणारा बेंगॉल टायगर हा जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. परंतु, अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या कमी होत आहे. वाघांची तस्करीसाठी अनिर्बंध शिकार, जंगलतोड आणि वाघांच्या अधिवासावर अतिक्रमण यामुळे मानव आणि वाघांमध्ये संघर्ष निर्माण होताना दिसत आहे
Project Tiger History : 'प्रोजेक्ट टायगर'ची सुरुवात
वाघांच्या संवर्धनासाठी १९७३ साली भारत सरकारने प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प सुरु केला. बेंगॉल टायगर म्हणजे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रोजेक्ट टायगरच्या माध्यमातून वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरु झाला. प्रोजेक्ट टायगरसाठी नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन ऑथोरिटी स्थापन करण्यात आली. M-STrIPES या मॉनिटरिंग सिस्टिमच्या माध्यमातून वाघांच्या हालचालीवर पाळत ठेवण्यात आली. त्यामुळे आपोआपच त्यांच्या शिकारीवर नियंत्रण आले
◆ जन्म
१. (१९०४) भारतीय उद्योजक आणि वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा यांचा जन्म
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या
टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधन संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले
● निधन
१. (१९९६) स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न अरुणा असफ अली यांचे निधन
इ. स. १९४२ सालच्या चले जाव आंदोलनात गांधीजीनी राष्ट्रास 'करो वा मरो' चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय होत्या. त्या १९५८ मध्ये दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. त्यांनी लिंक या नावाने प्रकाशन संस्था काढून वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके प्रकाशित केली
२. (२००६) मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन
ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची 'आस्वाद समीक्षा' साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment