दिनविशेष २१ जुलै

दिनविशेष

दि. २१ जुलै

◆ जन्म 

१. (१९१०) स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म

पागे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या संकल्पनेतून १९७७ साली महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या रोजगार हमी योजना कायदामुळे गोरगरीब जनतेला मोठा लाभ झाला. महाराष्ट्राचे पुरोगामित्त्व सिद्ध करणारा हा क्रांतिकारक कायदा होता. ते विधान परिषदेचे सभापती ही राहिले


२. (१९२०) गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म

शब्दांच्या या जादुगाराने आपल्या गीतांनी रसिकांना जणू मोहिनीच घातली. प्रेमाची ओढ असो की विरह, आई-मुलातील वात्सल्य असो की मरणाची अपरिहार्यता असो, आनंद बक्षींच्या लेखणीने या सर्व भावना रसिकांच्या मनी ठसायच्या. १९५८ मध्ये आलेल्या ‘भला आदमी’ या चित्रपटात आनंद बक्षींनी पहिल्यांदा गीते लिहिली. ‘धरती के लाल न कर इतना मलाल’ हे त्यांचे पहिले गाणे. आनंद बक्षी प्रकाशझोतात आले ते ‘जब जब फूल खिले’च्या गीतांमुळे. या चित्रपटात त्यांची लेखणी अशी खुलली की तिने रसिकांची मने काबीज केली. ‘ये समा, समा है ये प्यार का’ हे यातले गाणे आजही ताजे, टवटवीत वाटते

● निधन

१. (२००२) भित्तिचित्रण (पोस्टर चित्रण) आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन

सुरुवातीच्या काळात त्यांनी फिल्मसिटी, रणजित स्टुडिओ, बॉंबे टॉकीज, नॅशनल स्टुडिओ अशा चित्रपट स्टुडिओंमधून पोस्टर रंगविण्याची कामे केली. त्यांची गुणवत्ता ओळखून व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या राजकमल चित्रमंदिरात बोलावून घेतले. त्या काळात कांबळ्यांनी दो ऑंखे बारा हात, अपना देश, तूफान और दिया, झनक झनक पायल बाजे, नवरंग, सेहरा, गीत गाया पत्थरोंने, अमर भूपाळी, सावता माळी, इ चित्रपटांची पोस्टर रंगवली. हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या मुघल-ए-आझम चित्रपटाचे पोस्टरदेखील त्यांनी रंगवले होते

कालांतराने कांबळे पोस्टरचित्रणाकडून व्यक्तिचित्रणाकडे वळले. पाच वर्षांच्या अभ्यासातून त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र राजमान्य, लोकमान्य ठरले. त्यांनी रंगवलेल्या राजर्षि शाहू महाराजांच्या चित्रावरून टपाल तिकिट बनवण्यात आले

२. (२००९) किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन

त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे इ.स. १९२४ मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल) काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर