दिनविशेष १४ जुलै

दिनविशेष

दि. १४ जुलै

★ महत्वपूर्ण घटना 

१. (१७८९) फ्रेंच राज्यक्रांती सुरुवात

१७८९ साली पॅरिस मधील नागरिकांनी फ्रेंच शासकांकडून होत असलेल्या अन्याया विरुद्ध फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे प्रतिक असलेल्या बॅलेस्टाईलच्या तुरुंगावर हल्ला केला. या घटनेपासून फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली

◆ जन्म

१. (१८५६) थोर समाजसुधारक, विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक या वृत्तपत्राचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला


२. (१९२०) केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म

पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजी यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे

● मृत्यू

१. (२००३) मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन

लीला चिटणीस ह्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून काम केले तसेच त्यांनी 'आज कि बात' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. त्यांची 'माँ ' ह्या चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यांचे त्यांच्या पतींबरोबरचे समाजकार्यातील योगदानही मोठे आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर