दिनविशेष १२ जुलै

दिनविशेष

दि. १२ जुलै

★ महत्वपूर्ण घटना

१. (१९८२) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड (NABARD) ची स्थापना

कृषी व ग्रामीण गैर कृषी विभागाला वित्तपुरवठा करून ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने संसदेच्या विशेष कायद्याने नाबार्डची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व भारत सरकारच्या मालकीने १९८२ साली करण्यात आली


◆ जन्म

१. (१९०९) प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म

१९५३ साली बिमलदांनी आधुनिक भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘बिमल रॉय प्रॉडक्शन्स’ या निर्मितीसंस्थेची स्थापना करून गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या दुई बिघा जोमी या काव्यातून स्फुरलेला 'दो बिघा जमीन' हा अभिजात चित्रपट दिग्दर्शित केला. इ.स. १९५५ साली प्रदर्शित झालेला त्यांचा देवदास हा चित्रपट फार गाजला होता

● निधन

१. (२०१३) चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे निधन

त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीत ७० हून अधिक वर्षे काम करून ४०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका अधिक गाजल्या

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर