दिनविशेष ०६ जून
दिनविशेष
दि. ०६ जून
■ दिनविशेष
१. (१६७४) शिवराज्याभिषेक दिन
रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली
◆ जन्म
१. (१९२९) भारतीय अभिनेते, राजकारणी सुनील दत्त यांचा जन्म
सुनील दत्त हे अभिनेते बरोबरच राजकारणीही होते. २००४-०५ दरम्यान ते मनमोहन सिंग सरकार मधील युवा कार्य व क्रिडा विभागात कॅबिनेट मंत्री होते
त्यांनी मदर इंडिया, साधना, सुजाता, छाया, दिशाभूल, वक्त, खानदान, मेरा साया, हमराज, पडोसन, रेश्मा आणि शेरा, जखमी नागिन, जानी दुश्मन, फूल आणि मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली
● निधन
१. (२००२) मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन
त्या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या
आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment