दिनविशेष ०५ जून

दिनविशेष

दि. ५ जून

■ दिनविशेष

१. जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभरात ५ जून रोजी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरण विषय जगभरात सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे. ज्यामध्ये दरवर्षी १४३ हून अधिक देशांचा सहभाग असतो. दरवर्षी या कार्यक्रमात व्यवसाय, गैर-सरकारी संस्था, समुदाय, सरकार आणि ख्यातनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला जातो

◆ जन्म 

१. (१८७९) भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म

ना. म. जोशी यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ. स. १९११ मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. त्यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचेच काम केले. त्यांच्या नेतृत्वात पुढे १९२९ साली AITUC (All India Trade Union Congress)ची स्थापना केली

२. (१८८१) हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार गोविंदराव टेंबे यांचा जन्म

ते एक प्रख्यात मराठी संवादिनी वादक, संगीत रचनाकार, नट व साहित्यिक होते. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर