दिनविशेष २५ जून
दिनविशेष
दि. २५ जून
★ महत्वपूर्ण घटना
१. (१९१८) वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा
शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा लागू केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्वाचा टप्पा मानला जातो
◆ जन्म
१. (१९०३) ख्यातनाम इंग्रजी, कादंबरीकार, पत्रकार जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, चतुराई, सामाजिक विषमतेची सखोल जाण, एकाधिकारशाहीला कडवा विरोध, भाषेची सुस्पष्टता आणि लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजावादावरचा गाढा विश्वास इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात आढळून येतात. १९८४, ॲनिमल फार्म ही त्यांची जगप्रसिद्ध पुस्तके आहेत
● निधन
१. (२००९) आपल्या संगीत, गायन व नृत्याने अवघ्या जगाला मंत्रमुग्ध करणारा सर्वांचा लाडका पॉपस्टार मायकेल जॅक्सन यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment