दिनविशेष २३ जून
दिनविशेष
दि. २३ जून
■ दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस
ऑलिम्पिक ही एक जागतिक, बहु-क्रीडा स्पर्धा आहे. जी जगभरातील खेळाडूंना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. हे उन्हाळी ऑलिंपिक आणि हिवाळी ऑलिंपिकमध्ये विभागले गेले आहे. ज्यामध्ये २०० हून अधिक देश, ४०० हून अधिक खेळांमध्ये भाग घेतात. दरवर्षी २३ जून रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस, ऑलिम्पिक खेळ आणि संपूर्ण खेळाची भावना साजरी करण्यासाठी जगाला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. ऑलिम्पिक चळवळीच्या स्थापनेचे प्रतीक म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो
२. आंतरराष्ट्रीय विधवा दिन
सर्व प्रदेशातील आणि संस्कृतीमधील सर्व वयोगटातल्या विधवा स्त्रियांसंदर्भात मुद्द्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संबोधित करण्यासाठी २३ जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातो. त्यानुसार दरवर्षी विधवा दिनाचे औचित्य साधून या दिवशी विधवा महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. जगभरातील विधवा महिलांची स्थिती सुधारावी, त्यांना इतर महिलांसारखे सामान्य जीवन जगता यावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात येतात
◆ जन्म
१. (१९४२) मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम नाट्य व चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म
डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे 'सामना', 'सिंहासन', गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' असे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे. इ.स १९७० च्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे
● निधन
१. (२००४) 'पाऊले चालती पंढरीची वाट' असे म्हणत अवघ्या महाराष्ट्राला पंढरीचा 'भक्ती मार्ग' दाखविणारे पहाडी आवाजाचे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे निधन
ते एक मराठी लोकसंगीत गायक होते. त्यांनी अनेक गीते, भीमगीते, भक्तीगीते आणि काही हिंदी कवाल्या गायल्या आहेत. भक्ती गीताबरोबरच त्यांची लोकगीते आणि बुद्धगीतेही खूप गाजली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment