दिनविशेष ०३ जून

दिनविशेष

दि. ०३ जून

■ दिनविशेष 

१. जागतिक सायकल दिन

एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र समितीने ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून निश्चित केला. सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त असा वाहन पर्याय आहे. त्यामुळे सर्वांना सामावून घेणारे वाहन म्हणून सायकलकडे पाहिले जाते

◆ जन्म 

१. (१८९०) भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक बाबुराव कृष्णराव मेस्त्री तथा बाबूराव पेंटर यांचा जन्म

सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली. १९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला होता

२. (१८९२) लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म

'सांजवात' या आत्मचरित्रामुळे मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवणार्‍या आनंदीबाई शिर्के या शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील एक मान्यवर लेखिका होत. ज्या काळात स्त्री-शिक्षणालाच समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध होता, त्या काळात खानदानी मराठा कुटुंबातील या स्त्रीने आपली सुधारक मते ठामपणे मांडली आणि दृढपणाने ती अमलातही आणली

३. (१९३०) भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म

कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी इ.स. १९७४ मध्ये नेतृत्व केले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर