दिनविशेष १९ जून
दिनविशेष
दि. १९ जून
■ दिनविशेष
१. जागतिक सिकल / अनेमिया दिवस
'सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. ‘सिकल सेल अॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. हा आजार पूर्णत: आनुवांशिक आहे. कोणत्याही सूक्ष्म जंतू किंवा विषाणूमुळे किंवा पोषक आहार न घेतल्यामुळे हा आजार होत नाही. १९ जून हा दिवस जागतिक सिकल सेल दिवस म्हणून पाळला जातो
२. राष्ट्रीय वाचन दिन
हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांचे वाचनावर खूप प्रेम होते आणि याच कारणास्तव हा दिवस वाचनाला समर्पित करण्यात आला आहे. हा दिवस वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो
★ घटना
१. (१९६६) शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना
शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेना पक्षाची स्थापना बाळसाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली
◆ जन्म
१. (१९७०) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा जन्म
● निधन
१. (२०२१) कथाकार, प्रवासवर्णनकार व विनोदी लेखक रमेश मंत्री यांचे निधन
त्यांनी जगभर भ्रमंती करून अनेक पुस्तके लिहिली. १९७९ या एकाच वर्षात त्यांची तब्बल ३४ पुस्तके प्रकाशित झाली. 'महानगर' ही त्यांची स्वानुभवावर बेतलेली कादंबरी प्रचंड लोकप्रिय झाली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment