दिनविशेष १८ जून

दिनविशेष

दि. १८ जून

◆ जन्म

१. (१८९९) स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिम्बक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म

भारत छोडो आंदोलनात झालेल्या त्यांच्या अटकेनंतर जेव्हा ते सुटून कारागृहाबाहेर आले, तेव्हा ते मध्य प्रदेशाच्या काउन्सिलवर निवडले गेले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांचा सहभाग होता. आपल्या आयुष्यातली अनेक वर्षे दादा धर्माधिकारींनी दलितांच्या आणि महिलांच्या उत्थानासाठी वेचली. दादा धर्माधिकारी हे वैचारिक क्रांतीच्या पक्षातले होते. त्यांच्या मते समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी लोकांच्या विचारांत परिवर्तन होणे आवश्यक आहे

२. (१९११) पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म

त्या भारतातील पहिल्या विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीधारक शास्त्रज्ञ होत्या

● निधन

१. (१८५८) झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचे निधन

त्या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील त्या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले

२. (२०२१) भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू होते. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले. त्यांना फ्लाइंग सिक्ख या टोपण नावाने ओळखले जाते

३. (२०२५) ज्येष्ठ लेखक आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर