दिनविशेष १७ जून

दिनविशेष

दि. १७ जून

■ दिनविशेष 

१. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन

वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी १७ जून हा दिवस जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. १९९२ मध्ये रिओ अर्थ समिट दरम्यान वाळवंटीकरण हे शाश्वत विकासासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणून ओळखले गेले. १९९४ मध्ये यूएन जनरल असेंब्लीने युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD) ची स्थापना केली. हा कायदेशीर बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार पर्यावरण आणि विकासाला शाश्वत जमीन व्यवस्थापनाशी जोडतो. UNCCD व्यतिरिक्त, UN ने १७ जून हा दिवस वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी जागतिक दिवस म्हणून घोषित केला

◆ जन्म 

१. (१९४१) मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक, राजकीय निरीक्षक व समीक्षक अरूण साधू यांचा जन्म

'सिंहासन' आणि 'मुंबई दिनांक' या राजकारणावर आधारित दोन विलक्षण आणि लोकप्रिय कादंबऱ्या त्यांनी लिहल्या. सिंहासन या कादंबरीवर आलेला सिंहासन हा चित्रपटही अजरामर ठरला

● निधन

१. (१६७४) राजमाता जिजाऊ यांचे निधन

त्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते

२. (१८९५) महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ गोपाल गणेश आगरकर यांचे निधन

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर