दिनविशेष १६ जून
दिनविशेष
दि. १६ जून
◆ जन्म
१. (१७२३) स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ते अॅडम स्मिथ यांचा जन्म
ते स्कॉटलंडचे एक तत्वज्ञ होते. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते. त्यांचे १७७६ साली प्रसिद्ध झालेले 'अॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स' हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जाते
● निधन
१. (१९२५) कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन
ते एक बंगाली वकील व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी पुढारी होते. त्यांना देशबंधू असे संबोधले जात असे
२. (१९४४) भारतीय रसायनशास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन
ते बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक, शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापन केली
३. (२०२०) पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये जपणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी आवाज उठवणारे पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन
रणदिवे यांनी पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान दिले. ते १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय होते. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. या लढ्यात त्यांनी डांगे, आचार्य अत्रे यांच्या बरोबर कारावासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालिक सुरू केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात येथूनच झाली होती. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रणदिवे रूजू झाले व महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. १५ सप्टेंबर १९८५ रोजी ते मटातून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले. १९७२ मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्तिलढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. ते सेबिस्टियन डिसोझा मुंबई मिररमध्ये फोटो एडिटर होते. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यावेळी त्यांनी धाडसाने छायाचित्रण करून पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. जो या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यापूर्वी त्यांनी फ्रेंच वृत्तसंस्था एएफपी साठीही काम केले होते. २००२ मधील गुजरात दंगलीचे वास्तवसुद्धा त्यांनी माध्यमांमध्ये आणले होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment