दिनविशेष १४ जून
दिनविशेष
दि. १४ जून
■ दिनविशेष
१. जागतिक रक्तदान दिन
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. जागतिक रक्तदान दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे हा आहे
रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) १४ जून रोजी जागतिक रक्तदान दिवस साजरा करण्यात येतो
◆ जन्म
१. (१९१६) मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन
ते आद्य मराठी नाटककार होते. त्यांच्या मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे
२. (१९२२) हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक के. आसिफ यांचा जन्म
हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व पटकथालेखन त्यांनी केले
३. (१९२८) अर्जेंटिनाचे मार्क्सवादी क्रांतिकारक, लेखक, गनिमी लढवय्यांचे म्होरके, लष्करतज्ज्ञ आणि राजकीय नेते चे ग्वेरा यांचा जन्म
ते क्यूबाच्या क्रांतिकाळातील एक प्रमुख नेते होते. वैद्यकीय शिक्षण घेत असताना चे ग्वेरा यांनी लॅटिन अमेरिकेचे भ्रमण केले. त्यादरम्यान त्यांना गरिबी व एलियनेशनचे विदारक दृश्य आढळले. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले. ते अनुभव व त्या निरीक्षणांद्वारे ते ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचले की लॅटिन अमेरिकन प्रदेशात रुजलेली आर्थिक विषमता ही भांडवलशाही, एकाधिकारशाही, नव-वसाहतवाद व साम्राज्यवाद ह्या आंतरिक घटकांचा परिणाम आहे. ह्यावर एकमात्र उपाय म्हणजे जागतिक क्रांती आहे. ह्या विचारांनी त्यांना ग्वाटेमालाच्या सामाजिक पुनर्रचनेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले
४. (१९६९) प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ यांचा जन्म
स्टेफी ग्राफ यांनी जगातील महत्त्वाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांंमध्ये २२ वेळा विजेतेपद पटकविले. सात वेळा विंबल्डन, सहा वेळा फ्रेंच ओपन, चार वेळा ऑस्ट्रेलिअन ओपन, पाच वेळा अमेरिकन ओपन जिंकले
१९८८ साली स्टेफी ग्राफ यांनी सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धा तसेच त्या वर्षीच्या सेऊल ऑलिंपिकमधील टेनिसमधील महिला एकेरीचे विजेचेपद जिंकून 'गोल्डन ग्रँड स्लॅम' पूर्ण केले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment