दिनविशेष ०९ मे

दिनविशेष

दि. ०९ मे

 ◆ जन्म 

१. (१८१४) मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म
 
ते मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धयु होते. त्यांच्या प्रयत्नातूनच प्रार्थना समाजाची स्थापना झाली

२. (१८६६) थोर समाजसेवक, महात्मा गांधी यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म

ते भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात

३. (१९२८) समाजवादी कामगार नेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जीनिव्हा येथील अधिवेशनात त्यांनी लागोपाठ तीन वेळा भारतीय कामगारांच्या शिष्टमंडळात प्रतिनिधित्व केले. नीलकंठ गुप्ते यांनी मिल मजदूर सभेचे सरचिटणीसपद, अध्यक्षपद काही काळ सांभाळले. हिंद मजदूर सभेचेही ते काही काळ राष्ट्रीय सचिव होते. हिंद मजदूर सभेच्या पुढाकाराने कामगार चळवळीच्या संशोधनार्थ स्थापलेल्या मणिबेन कारा लेबर इन्स्टिट्यूट या संस्थेचे ते स्थापनेपासून संचालक होते. कामगार चळवळीच्या अनुषंगाने त्यांनी मराठी व इंग्लिश भाषांतून ग्रंथ, निबंध लिहिले

● निधन

१. (१९१९) नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक यांचे निधन

नारायण वामन टिळक अतिशय हुशार, एकपाठी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. ते मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचे जाणकार होते. त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. ते शीघ्रकवी होते. त्यांनी १०० हून अधिक भक्तिगीते, ओव्या व अभंगांची रचना केली. त्यांनी एकूण २१०० हून अधिक कविता रचल्या आणि ख्रिस्तायन नावाचे महाकाव्यही लिहिले. ते उत्तम वक्ता होते ते ख्रिश्चन धर्मावर कीर्तने करीत

२. (१९५९) बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन

ते मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर