दिनविशेष ०८ मे
दिनविशेष
दि. ०८ मे
■ दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन (World Red Cross Day)
जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी ८ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस रेड क्रॉसचे जनक जीन-हेन्री ड्युनंट (Henry Dunant) यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. जीन हेन्री ड्युनंट यांचा जन्म ८ मे १८२८ रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरात झाला. त्यांना १९०१ मध्ये जगातील पहिले शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. जीन ड्युनंट यांनी १८६३ मध्ये इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (ICRC) ची स्थापना केली होती. पुढे १९२० मध्ये भारतातही अशीच एक संस्था स्थापन करण्यात आली, तिचे नाव होते 'इंडियन रेड क्रॉस सोसायटी'
जागतिक रेडक्रॉस दिनाचा इतिहास - १८५९ मध्ये सॉल्फेरिनो (इटली) येथे एक भयंकर युद्ध झाले, ज्यामध्ये ४० हजारांहून अधिक सैनिक मरण पावले आणि लाखो जखमी झाले. जखमी सैनिकांची दुर्दशा पाहून हेन्री ड्युनंटला खूप वाईट वाटले. तेव्हा हेन्री ड्युनंटने गावातील काही लोकांसह त्या सैनिकांना मदत केली. यानंतर, १८६३ मध्ये, त्यांनी एक समिती स्थापन केली. या समितीला 'इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस' (ICRC) असे नाव देण्यात आले. जागतिक रेड क्रॉस दिन पहिल्यांदा १९४८ मध्ये साजरा करण्यात आला होता. मात्र, हा दिवस १९८४ पासून अधिकृतपणे साजरा केला जात आहे
● निधन
१. (१९८२) मराठी कवी आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचे निधन
कवि अनिल यांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता - हा काव्यप्रकार त्यांनी सुरू केला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment