दिनविशेष ०१ जून

दिनविशेष

दि. ०१ जून

■ दिनविशेष

१. शाळेच्या प्रवेशानुसार जन्मदिन

आज १ जून तारखेनुसार, शाळेच्या दाखल्यानुसार बहुसंख्य लोकांचा वाढदिवस असतो. जुन्या काळी १ जून रोजी मुलांचा शाळेत प्रवेश व्हायचा. बऱ्याचं पालकांना मुलांची जन्मतारीख माहिती नसायची त्यामुळे शाळेत प्रवेश घेतलेली तारीखचं त्यांचा जन्मदिन झाली. हा दिवस सरकारी जन्मदिन म्हणून चर्चिला जातो

२. जागतिक दूध दिन

जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार २००१ पासून दरवर्षी १ जून हा दिवस संपूर्ण जगभरात 'जागतिक दूध दिन' म्हणून साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे

३. जागतिक पालक दिन

जागतिक पालक दिनाची सुरुवात सर्वात आधी १९९४ मध्ये यूएन जनरल असेंब्लीमध्ये झाली. जगात आपली ओळख आपल्या पालकांद्वारे केली जाते. आपले पालकच आपल्याला घडवतात आणि त्यांच्या नावानेच आपल्याला ओळख मिळते. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पालकांच्या संस्कारांमुळे आणि त्यांनी दिलेल्या संगोपनामुळेच आहोत. पालक आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्यातील आनंदाशी तडजोड करतात. पालकांचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे 'जागतिक पालक दिन'.

जागतिक पालक दिन हा दिवस मुलांच्या जीवनात पालकांचे महत्त्व नेमकं काय हे पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. पालकांची आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भूमिका साजरी करण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. काही ठिकाणी भाषणं, सभा, मैफिली आणि प्रदर्शनांचा समावेश करण्यात येतो. जगभरातील पालकांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यावेळी आई-वडील आणि मुलांच्या नात्यात एक वेगळीच आपुलकी पाहायला मिळते

आई-वडील आपल्या आयुष्यासाठी जे काही करतात, त्यामागे कोणताही स्वार्थ लपलेला नसतो. आपल्या मुलाच्या सुखासाठी ते काहीही करायला तयार असतात. आपल्या यशामागे सर्वात मोठा हात पालकांचा असतो. मात्र, याबाबत, त्यांनी दिलेल्या अमूल्य प्रेमाबाबत आपण त्यांचे कधीही आभार मानत नाही. जागतिक पालक दिन हा पालकांचे आभार मानण्याचा दिवस आहे. तसेच, आपले वृद्ध आई-वडील हे आपले ओझे नसून ते आपली जबाबदारी आहेत याची जाणीव करून देण्याचा दिवस आहे. ही जबाबदारी आपण कर्तव्य समजून पार पाडली पाहिजे. या निमित्ताने अनेक देशांत आई-वडिलांना शुभेच्छा, भेटवस्तू दिल्या जातात

४. (१९४८) एस. टी. दिन

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली

एसटीची सेवा 'गाव तेथे एसटी', 'रस्ता तेथे एसटी' या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यांत विस्तार झाला आहे

◆ जन्म 

१. (१९३६) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील समता चळवळींचे मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांचा जन्म

ते असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून परिचित आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे किंवा विचारांचे नेते समजले जातात. बाबा आढाव हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत

● निधन

१. (१९३४) प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे निधन

ते मराठीतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक होते. 'बहु असोत सुंदर, संपन्न की महा' या गीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत

२. (१९६८) अंध मूकबधिर असूनही महाविद्यालयातून पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन

त्या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. केलर यांनी १२ पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत. दि वर्ल्ड आय लिव्ह इन : केलर यांनी द वर्ल्ड आय लिव्ह इन (पुस्तक) (इ.स. १९०८) साली प्रकाशित केले

३. (१९८३) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई चव्हाण यांचे निधन

यशवंतरावांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीत वेणूताईंचा मोठा वाटा होता. अतिशयोक्ती नाही, परंतु यशवंतराव वजा वेणूताई म्हणजे शून्य असेच उभयतांचे वर्तन, स्वभाव आणि नाते होते

४. (२००६) लोकसत्ता दैनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन

माधव गडकरी यांचे पत्रकारितेतील योगदान मोठे आहे. त्यांनी लेखन केलेले अग्रलेख वाचनीय असत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर